भुयारी मार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:20 AM2018-06-05T00:20:40+5:302018-06-05T00:20:40+5:30

शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़

 There is no problem in the subway, there is no problem; | भुयारी मार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

भुयारी मार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

Next

नाशिक : शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़  दरम्यान, पादचाºयांची रोजची सर्कस थांबविण्यासाठी या परिसरात भुयारी मार्ग करण्यात आला; मात्र गर्दुल्ले, भटक्यांचे वास्तव्य, अस्वच्छता यामुळे नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे बंद केले व त्यानंतर हा भुयारी मार्गही बंद करण्यात आला़ सद्यस्थितीत या भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, त्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे़  द्वारका सर्कल परिसराला मुख्य चार रस्ते जोडले गेले असले तरी या रस्त्यांचे तब्बल अकरा पदर या भागात एकवटतात. त्यामध्ये मुंबई नाका भागाकडे जाणाºया व येणाºया रस्त्याचे चार पदर, सारडा सर्कलकडे जाणारे दोन, बागवानपुºयाकडे जाणारा एक, धुळ्याच्या दिशेने जाणारे दोन व उड्डाणपुलाला जोडणारे दोन पदर द्वारका सर्कल परिसरात एकवटतात. आजूबाजूच्या रस्त्याने येणारी अवजड आणि दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होऊन वारंवार अपघातही घडतात. कधी कधी तर वाहतूक पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होते़  द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा अल्पकाळ पादचाºयांकडून वापर करण्यात आला; मात्र त्यानंतर या ठिकाणी गर्दुल्ले, अस्वच्छता यामुळे पादचाºयांनी याकडे तोंड फिरविणेच पसंत केले़ त्यातच अनेक वर्षांपासून या ठिकाणी साफसफाई केली जात नसल्याच्या तक्रारीदेखील महापालिकेकडे केल्या. या तक्रारींना अनेक महिने केराची टोपली दाखविण्यात आली. त्यातच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीचअचानक भेटी देण्याचा सिलसिला सुरू केला. आयुक्तांची धास्ती घेतलेल्या अधिकाºयांनी १३ मे २०१८ रोजी कर्मचाºयांकडून द्वारका येथील भुयारी मार्ग व परिसराची साफसफाई केली.  सद्यस्थितीत द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, केवळ बाजूचा मार्ग खुला करण्यात आला आहे़ त्यामुळे निर्मनुष्य असलेल्या या भुयारी मार्गात अनुचित घटना घडण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे़ भुयारी मार्गाचा वापर करावयाची सवय लावायची ठरल्यास या ठिकाणी आणखी पोलीस नेमून जनजागृतीद्वारे नागरिकांची मानसिकता तयार करावी लागणार आहे़ याबरोबरच येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका व पोलीस तसेच एनएएचआय या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे़

Web Title:  There is no problem in the subway, there is no problem;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.