प्रभाग समित्यांवर प्रस्ताव नसल्याने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:41 AM2018-11-17T00:41:50+5:302018-11-17T00:42:12+5:30
प्रभाग समितीच्या सभेत विषय पत्रिकेवर नागरी कामांच्या प्रस्तावच येत नसल्याने अधिकारी वर्ग कामे करीत नसल्याचा ठपका पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१६) ठेवण्यात आला प्रशासनाचा निषेध नोंदण्यात आला तसेच आरोग्य व अतिक्र मणावरून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते.
इंदिरानगर : प्रभाग समितीच्या सभेत विषय पत्रिकेवर नागरी कामांच्या प्रस्तावच येत नसल्याने अधिकारी वर्ग कामे करीत नसल्याचा ठपका पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१६) ठेवण्यात आला प्रशासनाचा निषेध नोंदण्यात आला तसेच आरोग्य व अतिक्र मणावरून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते.
पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १६) सभा पार पडली. यावेळी गेल्या चार महिन्यांपासून सभेत विषयपत्रिकेवर एक विषय येत नाही याचा अर्थ अधिकारीवर्ग काम करत नाही. त्यामुळे प्रभागात कामे होत नाही फक्त विषय पत्रिकेवरील कार्यवृत्त कायम करण्यासाठी प्रभाग सभा घेतात का? असे म्हणत सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाचा निषेध केला.
गेल्या महिन्यात झालेल्या प्रभात सभेत प्रभाग क्र मांक तीसमधील गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सभात्याग करण्याचे प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे यांच्यासह सदस्यांनी जाहीर केले आणि त्यानुसार सभात्याग केला होता, परंतु पाणीप्रश्न सुटल्याने अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच विभागीय अधिकाºयांच्या विशेषाधिकारात वर्षाकाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असतानाही त्यांनी फक्त वर्ष संपायला आला तरी फक्त पंचवीस लाख रु पये निधी वापरला आहे, उर्वरित ७५ लाख रु पये निधी वापरून प्रभागात कामे करावे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. प्रभाग क्र मांक तीसमधील श्रद्धाविहार कॉलनी परिसरातील फोरच्युनर अपार्टमेंट लगत भूमिगत गटारीचे पाणी एका मोकळ्या प्लॉटमध्ये सोडून दिल्याने सुमारे एक हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच परिसरात सुमारे डेंग्यूसदृश आजाराचे सात ते आठ रु ग्ण आढळले होते सदर कामासाठी पोलीस पोलीस बंदोबस्तासाठी एक महिन्यापूर्वी पैसे भरून सुद्धा सदर अधिकारी काम करीत नसल्याने प्रशासनाला अॅड. श्याम बडोदे धारेवर धरले. प्रभाग क्र मांक २३ मधील सुमारे पस्तीस कर्मचाºयांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी फक्त पाचच सफाई कर्मचारी असल्याने प्रभागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे चंद्रकांत खोडे यांनी सांगितले. इंदिरानगर येथील रथचक्र चौकात पुन्हा भाजीबाजार बांधण्यास सुरुवात झाल्याने अतिक्र मणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. प्रभाग क्र मांक चौदामध्ये ठिकठिकाणी गटारी तुंबल्या असून, कर्मचाºयांकडे तक्र ार केली असता त्याची दखल घेतली जात नाही आणि नगरसेवकांची कामे ऐकत नसल्याचे तक्र ार शोभा साबळे यांनी केली काठेगल्ली सिग्नल ते नागजी सिग्नल दरम्यान या रस्त्यावर हात गाड्यांच्या अतिक्र मणामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, असे अर्चना थोरात यांनी सांगितले.
इन्फो...