ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:29 PM2019-06-26T13:29:12+5:302019-06-26T13:29:21+5:30

ब्राह्मण गाव : येथे व परिसरात रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा नक्षत्र ही कोरडे जाण्याचे मार्गावर असून जून महिना संपत आला असताना अद्याप पेरणी योग्य पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.

 There is no rain in the Brahmin village, due to anxiety | ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या वर्षी ही पावसाळा कमीच झाल्याने संपूर्ण वर्ष पाण्या अभावी शेती व्यवसायावर संकट ओढवले आहे.गावाचे दोन भाग पाहता अर्धा आधिक भाग हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.तर अर्धा भाग गिरणा कालव्यावर अवलंबून आहे.आज तर गेल्या चार पाच महिण्या पासून विहिरी नी तळ ग



ब्राह्मण गाव : येथे व परिसरात रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा नक्षत्र ही कोरडे जाण्याचे मार्गावर असून जून महिना संपत आला असताना अद्याप पेरणी योग्य पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
आहे त्या पाण्यावर घर व जनावरांना चारा व पिण्याचे पाणी कसेबसे उपलब्ध झाले.मात्र शेती उत्पन्न पूर्ण घटले आहे. या भागात कांदा हे प्रमुख पीक असून कांद्याला पुरेसा भाव न भेटल्याने शेती व्यवसायावर संकट ओढवले आहे. त्यामुळे मजूर , व अन्य व्यवसायांवर ही मंदीचे सावट पसरले आहे.
या वर्षी तरी पाऊस वेळेवर येईल या आशेवर शेतकº्यांसह सर्वच आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.मात्र अद्याप पाऊस न झाल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतीची पेरणी पूर्व मशागत करून आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. बाजारात खते, बियाणे उपलब्ध झाले असले तरी पावसा बरोबरच शेतकर्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच अद्याप पीक कर्ज उपलब्ध होत नाही. जिल्हा बँकेने तर दोन्ही हात वरती केले आहेत तर राष्ट्रीय कृत बँका शेतकऱ्यांना थकबाकी चे कारण देऊन कर्ज देण्यास नकार देत आहेत.
सर्वात मोठा दुष्काळ या वर्षी शेतकº्या सह सर्वांना जाणवलं आहे.पाण्याचे महत्त्व लक्षात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करण्यासाठी वेळीच उपाय योजना करण्याची मागणी वाढली आहे. निसर्ग सर्वांची परीक्षा घेत आहे आता शासनाने तरी शेतकº्यांचे पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे.तर वरु ण राजाने आता तरी भरपूर पाऊस पडून शेतकº्यांसह सर्वांवर कृपा करावी अशी प्रार्थना केली जात आहे.

Web Title:  There is no rain in the Brahmin village, due to anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.