कांदा विक्रीचे पैसे न मिळाल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:04 AM2018-04-19T00:04:06+5:302018-04-19T00:04:06+5:30

ममदापुर : परिसरातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल उपबाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने संतप्त शेतकरी शुक्रवारपासून (दि.२०) येवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेश बहिरम, सहायक निबंधक एकनाथ पाटील व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिले आहेत.

There is no scope for the payment of onion sales | कांदा विक्रीचे पैसे न मिळाल्याने संताप

कांदा विक्रीचे पैसे न मिळाल्याने संताप

Next
ठळक मुद्देयेवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार काही शेतकºयांना अरेरावीची भाषा वापरून परत पाठवले.

ममदापुर : परिसरातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल उपबाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने संतप्त शेतकरी शुक्रवारपासून (दि.२०) येवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेश बहिरम, सहायक निबंधक एकनाथ पाटील व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिले आहेत. ममदापुर, खरवंडी, रेंडाळा, सायगाव, न्याहारखेडा, भारम, वायबोथी, गवंडगाव, अंदरसूल या गावातील शेतकºयांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजारात फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्र ी केला, परंतु या विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्याप कोणत्याही शेतकºयाच्या खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने सहायक निबंधक येवला याच्या कार्यालया- समोर शुक्रवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 
व्यापाºयाकडून उडवाउडवीची उत्तरेअंदरसूल येथील राजेंद्र धुमाळ यांनी तीन ते साडेतीन हजार रु पये भावाने कांदा खरेदी केला आणि पैसे रोख न देता चेक स्वरूपात दिले. त्या चेकवर एक महिन्याच्या पुढील तारीख टाकून दिले. शेतकरी वर्गाने सदर चेक बॅक खात्यावर जमा केले, परंतु जवळपास चाळीस ते पंचेचाळीस चेक व्यापारी धुमाळ यांच्या खात्यावर पैसे नसल्याने परत आल्यानंतर शेतकरी चेक घेऊन धुमाळ यांच्याकडे गेले असता उद्या या नंतर देतो. अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली. तर काही शेतकºयांना अरेरावीची भाषा वापरून परत पाठवले.

Web Title: There is no scope for the payment of onion sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.