तलाठी कार्यालय नसल्याने ग्रामस्थांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:07 PM2020-01-28T17:07:17+5:302020-01-28T17:09:08+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.
दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आले होते. परंतू सहा वर्षापुर्वी वणी सापुतारा रस्त्यावरील ट्रक घुसून तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले होते.
त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांनी कार्यालयाच्या बांधकास त्वरीत सुरवात करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, परंतू गेल्या सात ते आठ वर्षापासून पांडाणे येथील तलाठी कार्यालयाची आठवण महसूल यंत्रणेला येत नसावी व आपला महसूल विभागाचा अधिकारी कुठे बसतात याची माहीती वरीष्ठानांना नसावी का ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
पांडाणे येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून तो न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने सतत हात झटकून दिल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
१) आम्ही शेतकरी आहोत प्रत्येक दाखले किंवा उतारा काढण्यासाठी आम्हाला कामधंदा बंद करु न वणीला जावे लागते तरी शासनाला विनंती आहे की पांडाण्यातील तलाठी कार्यालय त्वरीत दुरु स्त करावे.
- संदीप कड.
२) दिंडोरी तालुका -सदर तलाठी कार्यालयाचा विषय आम्ही लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्वरीत लक्ष घालून शेतकरी व विद्यार्थासाठी त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करून दयावे.
- संपत कड, अध्यक्ष, राष्ट्रवादी सोशल मिडीया, दिंडोरी.
४) अनेक वेळा तलाठी कार्यालयासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वारंवार विनंती करु न त्यांनी आज पर्यत कोणतीच दखल घेतली नाही आता आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फत आंदोलनाच्या तयारीत आहोत तरी शासनाने चार गावाच्या महसूलचा विचार करु न तरी कार्यालय दुरु स्ती करावी.
- सचिन कड, माजी तालुकाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना.
५) प्रत्येक कागदासाठी सारखे वणीला जावे लागते कधी लाईट असते कधी नसते आमचा वेळ व पैसा दौघे वाया जाते म्हणून त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करावे.
- गुलाब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, दिंडोरी.