शहरात पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:13 AM2021-05-08T01:13:57+5:302021-05-08T01:14:28+5:30

दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली आणि पाणी कपातीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. 

There is no water shortage in the city | शहरात पाणीकपात नाही

शहरात पाणीकपात नाही

Next
ठळक मुद्दे महापौर कुलकर्णी : गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

नाशिक : दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली आणि पाणी कपातीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. 
दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट घोंगावत असते. यंदा मात्र कपातीची तशी स्थिती नाही. मात्र गेल्या वर्षी दारणा धरणातून काही प्रमाणात मलयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर त्यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला होता. महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्नदेखील झाला हेाता. त्यानंतर दारणा धरणात महापालिकेचे चारशे  दशलक्ष घनफूट आरक्षण असतानाही या भागाला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. 
दारणा धरणाऐवजी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात असल्याने या धरणावर ताण पडत असून अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यत असल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी रामायण येथे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  या वेळी पाणी कपातीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. 
 

Web Title: There is no water shortage in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.