शहरात पाणी कपात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:13+5:302021-05-08T04:15:13+5:30
नाशिक : दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला ...
नाशिक : दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली आणि पाणी कपातीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट घोंगावत असते. यंदा मात्र कपातीची तशी स्थिती नाही. मात्र गेल्या वर्षी दारणा धरणातून काही प्रमाणात मलयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर त्यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला होता. महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्नदेखील झाला हेाता. त्यानंतर दारणा धरणात महापालिकेचे चारशे दशलक्ष घनफूट आरक्षण असतानाही या भागाला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दारणा धरणाऐवजी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात असल्याने या धरणावर ताण पडत असून अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यत असल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी रामायण येथे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी पाणी कपातीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
शहरात तूर्तास पाणी कपात केली जाणार नसून नागरिकांनी मात्र पाणी बचत करावी, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. या वेळी बैठकीत सभागृहनेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, विलास शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर या वेळी चर्चा केली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई करू नये, असे मत पदाधिकारी व गटनेते यांनी व्यक्त केले.
या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस.एम. चव्हाणके व अविनाश धनाईत उपस्थित होते.
कोट...
सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला साठा आणि शहराची गरज बघता तातडीने कपात करण्याची गरज नाही. त्यातच कोरोनाची सद्य:स्थिती बघता पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
- सतीश कुलकर्णी महापौर
----
या बातमीत फॉलोअपचा लोगो वापरावा, तसेच सोमवारी हॅलोच्या अंकातील मेन फिचरचे कोलाज वापरावे.
छायाचित्र आर फोटोवर ०७ सतीश कुलकर्णी