There is a series of accidents on Taravalanagar Chaufuli
तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:08 PM2018-12-15T22:08:28+5:302018-12-15T22:09:02+5:30
नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ या अपघातानंतर मालट्रक व पिकअप ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. पहाटेच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात घडत असल्याने आता तरी गतिरोधक टाकण्याची सुबुद्धी प्रशासनाला येईल का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तारवालानगर ते पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने दिंडोरीकडून नाशिककडे जाणाºया पिकअपला जबर धडक दिली़ या धडकेनंतर पिकअप व मालट्रक ही दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली़ यामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
...तर अपघात टळला असता दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली सिग्नल हा अपघाताचे केंद्र बनल्याने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी करीत आहेत़ शनिवारी पहाटे मालट्रक व पिकअप यांच्यातील अपघात प्रशासनाने गतिरोधक बसविले असते तर कदाचित वाहनांचा वेग कमी झाला असता व टळला असता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची काम केले, मात्र मनपाने गतिरोधक बसविण्याची परवानगी नसल्याचे कारण पुढे करून काही तासांतच टाकलेले गतिरोधक जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले होते़
Web Title: There is a series of accidents on Taravalanagar Chaufuli