मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:00 AM2020-08-22T00:00:36+5:302020-08-22T01:10:23+5:30

समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.

There should be pressure for anthropocentric development | मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

googlenewsNext
ठळक मुद्दे महाराष्ट्र सोशल फोरम : चर्चासंवादात असंघटित घटकांच्या प्रश्नांवर मंथन

नाशिक : समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित चर्चा संवादाच्या तिसऱ्या दिवशी असंघटित घटकांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यात स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष या विषयावर झालेल्या संवादात नीरजा, मनस्विनी लता रवींद्र, अरुणा सबाणे, निशा शिवूरकर, प्रज्ञा दया पवार, वर्षा देशपांडे यांनी भाग घेतला.
असंघटित श्रमिकांचे अर्थव्यवस्थेतील स्थान या विषयी एम. ए. पाटील, डी.एल. कराड, विश्वास उटगी, पौर्णिमा चिकरमाने, संजय सिंघवी यांनी विचार मांडले. कामगार कायदे पातळ करून कामगार वर्गाचे अस्तित्व संपवण्याचा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी त्यांचे विचार मांडताना केला. तर उध्वस्त शेती - उध्वस्त अर्थव्यवस्था व पुढील आव्हाने याविषयी भालचंद्र कांगो यांनी मानव केंद्री विकास करण्याची गरज व्यक्त केली.
महाराष्ट सोशल फोरमने समान विकासाचा कार्यक्रम ठरवून तो अमलात आणण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली. अशोक ढवळे यांनी शेतीचे कर्पोरेटिकरण केंद्र सरकार करू पाहतेय ते हाणून पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुशीला मोराळे यांनी शेतकरी महिलांच्या आरोग्याच्याचे प्रश्न गंभीर असल्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. कामगार नेते शशांक राव यांनी शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भूमिका मांडली.

प्रश्न तडीस नेण्यासाठी एकत्र येणे गरजेचे
या चर्चासत्रात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज सर्व वक्त्यांनी मांडली. त्याचपरमाणे आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलनं याविषयावर सुरेखा दळवी, वाहरु सोनवणे, धनाजी गुरव, लक्ष्मण माने, मंगेश भारसाखळे, अजित शिंदे यांनी विचार मांडले. चळवळींनी या घटकांच्या प्रशनांनाना अग्रक्रम द्यावा अशी सर्व वक्त्यांनी मांडणी केली.

दबाव निर्माण व्हावा
कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न दबाव निर्माण करून सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातील एक हजाराहून जास्त संस्था संघटना , श्रमिक, मजूर संघटना आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात तिसºया दिवशी सहभाग घेतला होता.

Web Title: There should be pressure for anthropocentric development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.