आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी संशोधन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:48+5:302021-08-18T04:20:48+5:30

नाशिक : आरोग्य क्षेत्रात आपण करीत असलेले संशोधन हे समाजासाठी उपयुक्त ठरणारे असावे, यादृष्टीने विचार करणे आवश्यक असून समाजोपयोगी ...

There should be socially useful research in the field of health | आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी संशोधन हवे

आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी संशोधन हवे

Next

नाशिक : आरोग्य क्षेत्रात आपण करीत असलेले संशोधन हे समाजासाठी उपयुक्त ठरणारे असावे, यादृष्टीने विचार करणे आवश्यक असून समाजोपयोगी संशोधनाच्या दिशेने अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आरोग्य शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व अभ्यासकांसाठी आयोजित ‘ॲडव्हान्स रिसर्च मेथडॉलॉजी’ ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. तर व्यासपीठावर विद्यापीठाच्या नियोजित कुलगुरू प्रमुख अतिथी डॉ. माधुरी कानिटकर यांच्यासह कुलसिचव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे आदी उपस्थित होते. डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, संशोधनातून उपयुक्तता सिद्ध होणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. केवळ पदवी म्हणून पीएच.डी. न करता त्याचा समाजास कसा उपयोग होईल, या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शकांनी आपण करीत असलेल्या संशोधनाची उपयुक्तता तपासून ते अधिक समाजोपयोगी ठरतील असे अनुषंगिक बदल करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला. सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपांजली लोमटे यांनी सूत्रसंचालन केले.

पदभार स्वीकारण्यापूर्वी विद्यापीठाचा अभ्यास

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवड केली आहे. परंतु सैन्यदलात कार्यरत असल्याने त्यांची निवड झाल्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही सैन्यातून कार्यमुक्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे डॉ. माधुरी कानिटकर विशेष सुट्टी घेऊन नाशिकमध्ये आल्या असून त्यांनी ॲडव्हान्स रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळेत सहभागी होत विद्यार्थी व प्राध्यपकांना मार्गदर्शन केले. डॉ. माधुरी कानिटकर या पाच दिवसांसाठी आरोग्य विद्यापीठात मुक्कामी असून या कालावधीत विद्यापीठाच्या कायदेशीर बाबींसोबतच विद्यापीठाची कार्यप्रणाली समजून घेतानाच वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व प्रमुखांच्या भेटी घेऊन आगामी कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सांगितले.

170821\17nsk_26_17082021_13.jpg

ॲडव्हान्स रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळेत बोलताना लेफ्टनंन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर. समवेत व डॉ. कालिदास चव्हाण,  डॉ. अजित पाठक, नरहरी कळसकर, डॉ. सुनिल फुगारे

Web Title: There should be socially useful research in the field of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.