बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:37 AM2018-03-13T01:37:47+5:302018-03-13T01:37:47+5:30

बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे.

There is still a stir between voters in the Market Committee | बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

Next

सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्र म जाहीर करून निवडणुकीचे बिगुल वाजविले. मात्र प्रथमच शासनाने प्रत्येक शेतकºयाला मतदानाचा अधिकार बहाल करून ऐतिहासिक निर्णय घेतला; परंतु हा निर्णय घेताना आवश्यक मार्गदर्शन नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मतदान याद्यांचा घोळ कायम होता. गेल्या महिन्यात गणरचना जाहीर करून आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला होता. सटाणा बाजार समितीत तब्बल २६४ हरकती नोंदविल्या गेल्या त्यापैकी १६ हरकती फेटाळण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्र म जाहीर केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्याचे संकेत दिले होते; मात्र कोणत्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बहाल करायचा याबाबत शासनाकडून मुदतीत मार्गदर्शन न आल्याने जाहीर केल्यानुसार सोमवारी (दि.१२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही.
सामाईक उताºयाचा तिढा सुटला
जानेवारी महिन्यात तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये सामाईक सातबारा उताºयावरील सर्वच शेतकºयांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शासनाविरु द्ध कमालीची नाराजी पसरली होती. यामुळे पणनने दखल घेऊन सामाईक सातबारा उताºयावरील पहिल्या क्र मांकाच्या नावाला मतदानाचा हक्क बहाल करावा, असे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले होते; मात्र यावर शेतकºयांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सुनवाई झाली़ सामाईक सातबारा उताºयावरील प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला कमीत कमी दहा गुंठे क्षेत्र येईल अशा सामाईक उताºयावरील शेतकºयांनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. एखाद्या उताºयावर सहा जणांची नावे असतील आणि क्षेत्र ५९ गुंठेच असेल, तर एकाही शेतकºयाला मतदानाचा हक्क राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत सामाईक उताºयावरील नावांचा तिढा सुटला असला तरी या निर्णयामुळे बहुतांश अल्पभूधारक शेतकरी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत.

Web Title: There is still a stir between voters in the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.