रस्त्याला मोठे भगदाड पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:52 PM2019-01-20T18:52:45+5:302019-01-20T18:54:09+5:30
पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस्ता अरुंद केला असून वर्षभरापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघाताची मालिका सुरु झाल्याने वाहनधारक, परिसरातील पिळकोस, भादवण गावातील ग्रामस्थांकडून व वाहनधारकांकडून संबंधित विभागावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील गिरणा नदीवर पुलाच्या उत्तरेकडील उताराच्या रस्त्याला एका एका वर्षापासून डोंगरावरील वाहून आलेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले असून संबंधित विभागाने त्या ठिकाणी सफेद मार्किंग केली असून ते भगदाड अजूनही तसेच आहे. या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधील मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. राज्यमहामार्ग क्र मांक - १७ पिळकोस बेज हा वाहतुकीसाठी सुरक्षित राहिला नसून वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सप्तशृंगी गड, कळवण, नाशिक, वणी, दिंडोरी, सापुतारासाठी हा रस्ता कमी पल्ल्याचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काही देणे घेणे नसून या दोन तीन वर्षापासून या रस्त्यावरील काटेरी बाभळी देखील काढल्यागेल्या नसल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला असल्याने पायी प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर वाहनधारकांना अपघाताचा सामना कराव लागत असल्याने वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून संताप होत आहे.
संबंधित विभागाने रस्त्यावरील भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव टाकावा व काटेरी बाभळी काढून रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी पिळकोस येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, मंगेश जाधव, सागर आहेर, शिवाजी जाधव, राहुल जाधव, दादाजी जाधव, निवृत्ती जाधव, हेमंत जाधव, सुरेश जाधव यांसह परिसरातील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.