बाधित आढळण्याच्या प्रमाणात झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:26 PM2020-08-23T22:26:12+5:302020-08-24T00:14:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना चाचण्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. गेल्या २८ दिवसांत ३८ हजारांहून अधिक अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ५ हजार ५५ बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के आहे तर निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के आहे.
नाशिक : महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना चाचण्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. गेल्या २८ दिवसांत ३८ हजारांहून अधिक अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ५ हजार ५५ बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के आहे तर निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात ६२९ रुग्ण आढळले आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दाट लोकवस्ती आणि अन्यत्रही असलेल्या बाधितांना हुडकून काढण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
त्याअंतर्गत २२ मोबाइल व्हॅन यानिमित्ताने शहरातील प्रतिबंधित तसेच दाट वस्तीच्या भागात फिरतात आणि आरोग्य तपासणी करून रुग्ण शोधण्याचे काम करीत असतात.
इतकेच नव्हे तर रुग्णांना काढा आणि प्रतिकारशक्ती वाढविणारी अन्य औषधेही दिली जातात. शहरात गेल्या २८ दिवसात ३८ हजार ७११ चाचण्या घेण्यात आले असून, पाच हजार ५५ रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे ३३ हजाराहून अधिक नागरिकांना दिलासा देण्यातयश आले आहे.
दरम्यान, चोवीस तासात
६२९ रुग्ण आढळले आहे.
तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे शिवारातील ६५ वर्षीय वृद्ध आणि नाशिकरोड येथील एका ३५ वर्षाच्या रुग्णाचा समावेश आहे. शनिवारी (दि.२२) ६२९ रुग्ण आढळले. आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांची संख्या १९ हजार ७१२ बाधित झाली आहे, तर १६ हजार ५५५रूग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ६३१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के.