भोंगे हटवण्याची मागणीच नव्हती निर्णय कसा घेणार? : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 01:32 AM2022-04-28T01:32:09+5:302022-04-28T01:32:34+5:30
सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.
राणा यांनी नोंदविलेला आक्षेप हा खार पोलीस ठाण्यातील नसून सांताक्रूज पोलीस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या आराेपासंदर्भातील मुद्द्यांची तपासणी करायची असल्यास सांताक्रूज पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केेले. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई होत नाही, हा आक्षेप चुकीचा असून ज्यांच्याबाबत आक्षेप आहे, त्यांच्याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यास ईडीकडून त्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात असेल तर त्यांची चौकशी होईल, असेही महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रंजना भानसी, सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव, सुनील केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरीचा नवीन पॅटर्न सत्ताधारी हे पोलिसांना हाताशी धरून किंवा पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी करीत असल्याचे आघाडी शासनाच्या काळात दिसून येत आहे. जर तुम्ही राज्य शासनाच्या विरोधात बोललात तर हल्ला चढवू अशाच प्रकारचे कामकाज सध्या राज्यात सुरू असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. वाटेल ते गुन्हे नोंदवायचे, त्यासाठी पोलिसांचा वापर करायचा. माझ्याबाबतही तेच झालं असून
पेन ड्राईव्ह मधून सत्य समोर आले असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.
इन्पो
राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका नाही
राज्यातील घटनाक्रम पाहता खोटे बोला पण रेटून बोला अशा प्रकारची राज्य शासनाची कार्यपद्धती आहे. राज्यातली स्थिती योग्य नाही.
मंत्री जेल मध्ये,हल्ले करायचे,फक्त राजकारण करायचे हेच सुरू आहे. दरोडा पडला तरी भाजपा,चोरी झाली तरी भाजपा, बलात्कार झाला तरी भाजपा असे काही झालं की भाजपकडे बोट दाखवायचे असे प्रकार सुरू आहे. तरीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी,अशी आमची भूमिका किंवा मागणी नव्हे.
इन्फो
मिटकरींचे बोलणे तेढ निर्माण करणारे
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान प्रकरणात केलेले वक्तव्य हे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते सर्व भाषणात सांगितले, ते समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. पवार साहेबांनीच त्यांना योग्य कानमंत्र द्यावा, असेही महाजन म्हणाले.