भारनियमनात बदल अन् बिबट्याच्या भीतीने पाणी असून पीके लागली करपू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:28 PM2018-01-09T13:28:14+5:302018-01-09T13:28:35+5:30
सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.
सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणताही विचार न करता आणि पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहे नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते. मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने पिकांना पाणी देण्याचे धाडस शेतकर्यांचे होत नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधी शांत असून कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारला जात नाही. वीज वितरण कंपनी मनमानी करून वीज वाचविण्याचा उद्देशाने रात्री उशिरा वीज पुरवठा करत आहे, मात्र यामध्ये शेतकºयांच्या जीवनाशी खेळ सुरू झाला आहे. रात्री उशिरा वीज वितरण सुरु करु न दिवसा अकरा वाजे पर्यंत वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे
-----------------
काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणतीही पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहेत. नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते, मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने शेतकºयांचे पिकांना पाणी देण्याचे धाडस होत नाही.
- संतोष राजोळे, शेतकरी, करंजगाव