साडेपाचशे कोटींच्या ठेवी मोडणार
By admin | Published: April 12, 2017 12:42 AM2017-04-12T00:42:02+5:302017-04-12T00:42:14+5:30
जिल्हा बॅँकेने राज्य शिखर बॅँकेकडे असलेल्या साडेपाचशे कोटींच्या ठेवी मुक्त करण्याची परवानगी मागितली.
शिक : जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बॅँकेने उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीवर मात करण्यासाठी राज्य शिखर बॅँकेकडे असलेल्या सुमारे साडेपाचशे कोटींच्या ठेवी मुक्त करण्याची परवानगी मागितल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, मंगळवारपासून (दि. ११) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने धनादेश क्लिअरिंगला सुरुवात केली आहे.सून, दिवसभरात सात ते आठ कोटींचे धनादेश क्लिअर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एका संचालकाने सांगितले.सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट व मुख्य कार्यकारी अधिकारी बोरस्ते यांना जिल्हा परिषदेत पाचारण करून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हा परिषदेचे सुमारे ४० ते ४५ कोटींचे धनादेश वटत नसल्याने दहा हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन, शेकडो सेवानिवृत्तांचे पेन्शन रखडले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने ३१ मार्चला सुमारे २० ते २५ कोटींचे धनादेशही क्लिअर होत नसल्याने मक्तेदारांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे तगादा लावल्याचे चित्र होते. त्यातच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर दादा भुसे यांनी मिलिंद शंभरकर यांना शिक्षकांचे वेतन तसेच सेवानिवृत्तांच्या पेन्शनची रक्कम तत्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात शंभर कोटींची पीककर्ज वसुली करून जिल्हा परिषदेचे धनादेश क्लिअर करण्याची ग्वाही दिली होती.
बुधवारी बैठक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी (दि. १२) मध्यवर्ती कार्यालयात तातडीची बैठक होत असून, या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अडचणींवर चर्चा होणार आहे. त्यातून काही तरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. संचालक मंडळ नेमका काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्णाचे लक्ष लागून आहे.
झेडपी कनेक्शन
जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे, संचालक केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर, दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर तसेच माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँक आणि जिल्हा परिषदेत समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
त्यातच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर दादा भुसे यांनी मिलिंद शंभरकर यांना शिक्षकांचे वेतन तसेच सेवानिवृत्तांच्या पेन्शनची रक्कम तत्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात शंभर कोटींची पीककर्ज वसुली करून जिल्हा परिषदेचे धनादेश क्लिअर करण्याची ग्वाही दिली होती. (प्रतिनिधी)