तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा बफर स्टॉक राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:22+5:302021-09-11T04:15:22+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना अधिक धेाका असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नव्या बिटको रुग्णालयात १०० खाटांचे विशेष ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना अधिक धेाका असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नव्या बिटको रुग्णालयात १०० खाटांचे विशेष बाल कोविड कक्ष उभारले असून, बालकांसाठी पाच व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत. शहरातील काही डेडिकेटेड खासगी बाल रुग्णालयांमध्ये उर्वरित तीनशे बेडसची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बालकांसाठी ४०० बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.
इन्फो...
पीजी शिक्षणक्रम लवकरच
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाऐवजी म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणक्रमाचे विभाग सुरू करण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता पीजी शिक्षणक्रमासाठी कमी खर्च करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो..
लसीकरणाला वेग
कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात आला असून, १४ लाख प्रौढ नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी किमान ५० टक्के नागरिकांना पहिला डाेस देण्यात आला आहे, तर अडीच लाख नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.