उंटवाडीला होणार स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:16 PM2020-07-25T22:16:01+5:302020-07-25T23:52:40+5:30

सिडको : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको परिसरात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, अनेकांचे मृत्यूदेखील होत आहे. यामुळे अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध राहत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यासाठी उंटवाडी येथील स्मशानभूमीची नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

There will be a cemetery at Untwadi | उंटवाडीला होणार स्मशानभूमी

उंटवाडीला होणार स्मशानभूमी

Next
ठळक मुद्दे महापालिकेचा निर्णय । येत्या दोन-तीन दिवसांत कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको परिसरात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, अनेकांचे मृत्यूदेखील होत आहे. यामुळे अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध राहत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यासाठी उंटवाडी येथील स्मशानभूमीची नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
येत्या दोन-तीन दिवसांतच स्मशानभूमी कार्यान्वित होणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. मनपा प्रभाग क्र मांक २५ मधील उंटवाडी स्मशानभूमीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते, पण काही किरकोळ कामे अपूर्ण राहिल्यामुळे अद्याप स्मशानभूमी सुरू करण्यात आलेली नाही. यासाठी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून शनिवारी पाहणी केली. कोरोनामुळे शहरातील मृत्युसंख्या वाढत असल्याने अमरधाममध्ये जागा मिळत नाही. नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी दिवसभर थांबायची वेळ आली आहे. उंटवाडी येथे स्मशानभूमी तयार असताना किरकोळ सुविधा नसल्याने अंत्यसंस्कार केले जात नाही. यासाठी मनपा कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, विभागीय अधिकारी संदेश शिंदे, ए. जे. काझी, गोकुळ पगारे , दिलीप हांडोरे आदींनी पाहणी करून येत्या तीन दिवसांत सर्व सोयींयुक्त स्मशानभूमी कार्यान्वित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी पवन मटाले, गोपी गिलबिले यांसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: There will be a cemetery at Untwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.