पालखेड डाव्या कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:48 PM2019-07-06T21:48:07+5:302019-07-06T21:54:17+5:30

येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे.

There will be five direct reelers and one escape gate on the left bank of Palkhed | पालखेड डाव्या कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार

पालखेड डावा कालवा

Next
ठळक मुद्दे पाटोदा तलाव, अंदरसूल, गवंडगाव, धामणगाव, उंदीरवाडी या गावांनाही याचा लाभ होणार आहे.

येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे.
पालखेड डावा कालवा येथे निफाड तालुक्यातील विंचूर येथे लोनगंगा नदीला पाणी सोडण्यासाठी एस्केप गेट होणार आहे. त्याचबरोबर आंबेगाव येथे आंबेगाव व पाचोरा पाझर तलाव भरण्यासाठी थेट विमोचक, येवला तालुक्यातील पाटोदा तलाव भरण्यासाठी थेट विमोचक, अंदरसूल येथे दगडी बंधारा भरण्यासाठी थेट विमोचन तर गवंडगाव येथे बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.  धुळगाव नदीवरील साखळी बंधारे भरण्यासाठी थेट विमोचकाच्या कामाचे नुकतेच छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे.
येवला मतदारसंघात पालखेड डावा कालव्यावर मंजूर झालेल्या पाच थेट विमोचक आण िएक एस्केप गेट यामुळे येवला तालुक्यातील सिंचनासाठी सुविधा मिळणार असून शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे. धरण समूहात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामामध्ये पालखेड कालव्यामधून ओव्हर फ्लोचे पाणी सोडले जाते. मात्र हे पाणी सोडण्यासाठी फाटक नसल्याने लोनगंगा नदी, गोरख नदी या नदी काठावरील गावे तहानलेलीच राहत होती. याठिकाणी कालव्याचे एस्केप गेट आण िथेट विमोचकामुळे या नद्यांवरील सर्व बंधार्यांमध्ये पाट पाणी सोडण्याची व्यवस्था होणार आहे. आंबेगाव व पाचोरा पाझर तलाव, पाटोदा तलाव, अंदरसूल, गवंडगाव, धामणगाव, उंदीरवाडी या गावांनाही याचा लाभ होणार आहे.

Web Title: There will be five direct reelers and one escape gate on the left bank of Palkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण