मनपाच्या बसमध्ये असणार हेड कॅप्चर कॅमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:46+5:302021-06-19T04:10:46+5:30

नाशिक महापालिकेची सेवा ही अत्यंत प्रगत असणार आहेे. विशेषत: तंत्रज्ञान अत्यंत अत्याधुनिक असणार आहे. महापालिका सुरुवातीला पन्नास डिझेल बस ...

There will be head capture cameras in the Corporation bus | मनपाच्या बसमध्ये असणार हेड कॅप्चर कॅमरे

मनपाच्या बसमध्ये असणार हेड कॅप्चर कॅमरे

Next

नाशिक महापालिकेची सेवा ही अत्यंत प्रगत असणार आहेे. विशेषत: तंत्रज्ञान अत्यंत अत्याधुनिक असणार आहे. महापालिका सुरुवातीला पन्नास डिझेल बस रस्त्यावर उतरवणार आहे. या बसदेखील अत्याधुनिक असणार आहेत. बसमध्ये जीपीएस असल्याने लोकेशन नियंत्रण कक्षाला तत्काळ कळू शकेल. प्रवाशांना बस प्रवासासाठी ॲपमधून ऑनलाईन तिकीट काढता येईल. बसमध्ये गेल्यावर त्याच्या ॲपमधून क्युआर कोड तपासण्यात येईल. म्हणजेच वाहक त्याची खात्री करून करून घेईल.

प्रत्येक बसमध्ये हेड कॅप्चर कॅमेरा असणार आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बसमध्ये किती प्रवासी असतील याची शिरगणती कॅमरे असणार आहेत. त्यातून बसमधील सुरक्षितता हा एक भाग असला तरी प्रवाशांची काटेकोर मोजणी हा त्या मागचा उद्देश आहे. बस एका कंपनीच्या आहेत तर वाहक दुसऱ्या कंपनीचे आहेत. त्यामुळे वाहकाने बसमध्ये दाखवलल्या प्रवाशांकडील तिकीट वसुली आणि प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या यात तफावत आढळली. तर तत्काळ महापालिकेची तिसरी तटस्थ यंत्रणेचे तिकीट चेकर म्हणजेच तपासणीसांचे पथक त्या ठिकाणी दाखल होईल आणि बसमधील प्रवासी मोजतील. फुकटा प्रवासी आढळला तर तत्काळ तिकिटाच्या दुप्पट दंड करण्यात येईल आणि नंतर निष्काळजीपणा करणाऱ्या बस वाहकालादेखील प्रवाशाला केलेल्या दंडाच्या दुप्पट रक्कम वाहकाकडून आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सुविधांबरोबरच काटेकोर कामकाज हे महत्त्वाचे ठरणार आहे.

इन्फो...

तब्बल ३५ तिकीट तपासणिसांची पथके

महापालिकेने तिकीट तपासणीचे काम आणखी एका त्रयस्थ एजन्सीला दिले आहे. त्यानुसार काम करणाऱ्या या कंपनीलादेखील गळती आणि चोरी शोधण्याचे उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचे कर्मचारी अधिक प्रभावीपणे काम करतील असा प्रशासनाचा दावा आहे.

कोट..

महापालिकेची बस सेवा आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या पुढारलेली असेल तरच प्रवासी आकर्षित होतील. त्यामुळे देशातील अन्य महापालिकांनी काय केले यापेक्षा लंडन, सिंगापूर या ठिकाणी कोणत्या आकर्षक सेवा दिल्या जात आहेत. तशा प्रगत तंत्रज्ञानाच्या सुविधांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Web Title: There will be head capture cameras in the Corporation bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.