...म्हणून सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, ॲड. उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

By संजय दुनबळे | Published: May 7, 2023 06:20 PM2023-05-07T18:20:51+5:302023-05-07T18:22:15+5:30

"अडीच वर्षांपूर्वीच मला खासदारकीची ऑफर होती..."

Therefore, there is no thought of joining politics at present, Adv. Ujjwal Nikam spoke clearly | ...म्हणून सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, ॲड. उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

...म्हणून सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, ॲड. उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

googlenewsNext

नाशिक : अडीच वर्षांपूर्वीच मला खासदारकीची ऑफर होती; पण सध्याचे राजकारण अस्थिर आणि गढूळ झाले आहे. शिवाय तो माझा प्रांत नाही. यामुळे सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असे मत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. येथील कुसुमाग्रज स्मारकात शनिवारपासून सुरू असलेल्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात रविवारी स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड. निकम यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. 

सुमारे दीड तास ही मुलाखत रंगली. सुमारे २५ वर्षांपूर्वी मालेगाव येथे घडलेल्या पेट्रोलपंप लूट प्रकरणातील टाडा कोर्टातील खटल्यानंतर मला मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्याची जबाबदारी मिळाली होती. आपल्याला मिळालेल्या संधीचे वेळीच सोने करता आले पाहिजे आणि मी ते केले असे ते म्हणाले. तसा मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी, २ टक्क्यांनी माझा वैद्यकीयचा प्रवेश हुकला आणि पुढे मी वकील झाल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गुन्हेगारांमध्येही स्वत:प्रती आदर निर्माण करण्याची ताकद ही सरकारी वकिलांमध्ये असते, ही गोष्ट आपोआप येत नसते, त्यासाठी अभ्यास लागतो. वाचन करावे लागते. माणसाची मानसिकता तयार करण्याची प्रक्रिया लेखक करतात, असेही ॲड. निकम यांनी सांगितले.
 

Web Title: Therefore, there is no thought of joining politics at present, Adv. Ujjwal Nikam spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.