शाळेच्या पहिल्या दिवशी थर्मल स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:44+5:302021-02-05T05:49:44+5:30
शाळा सुरू होण्यापूर्वीच निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. पालकांकडून संमतीपत्र घेतले जात होते. ...
शाळा सुरू होण्यापूर्वीच निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. पालकांकडून संमतीपत्र घेतले जात होते. एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात येत होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दिवसाआड शाळा ठेवण्यात आली आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मुलींना तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी मुलांना बोलविण्यात आले आहे. एका बाकावर एक विद्यार्थी आणि दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकट-
पांगरीत काळजी घेण्याच्या सूचना
पांगरी : येथील श्री संत हरीबाबा विद्यालयामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर याचा वापर करून शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी मुख्यध्यापक डी. बी. गोसावी यांनी सोमवार, बुधवार, शुक्रवार रोजी पाचवी अ , ब, सातवीचे अ, ब, नववीचा अ, दहावीचा अ, ब चे वर्ग तसेच मंगळवार, गुरुवार , शनिवार रोजी सहावी अ, ब, आठवी अ, ब, नववी ब, दहावी अ व ब चे वर्ग भरणार असून विद्यालयाची वेळ ११ ते २ अशी असेल. येताना मास्क किंवा रुमाल, सॅनिटाइझर सोबत, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. तसेच दररोज विद्यालयात आल्यानंतर थर्मल स्कॅनिंगच्या सह्याने स्वत:च्या तापमानाची नोंद तारखेनुसार वहीत करावी, एका बाकावर एकाच विद्यार्थ्याने बसावे, येताना शालेय स्वच्छ गणवेशात यावे. वरील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या.
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील संत हरिबाबा विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यासह सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.