ही वाहनतळाची की कोंडीची ठिकाणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:51 AM2019-07-12T00:51:37+5:302019-07-12T00:55:48+5:30

शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला वाहनतळ उभारून स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील तेरा ठिकाणांचेच अधिकृत स्पॉट घोषित केले असले तरी अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत रहदारीचे तसेच काही रस्ते तर तुलनेत अरुंद असून, अशावेळी येथे मोटारी उभ्या करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची शक्यता आहे.

These parking places? | ही वाहनतळाची की कोंडीची ठिकाणे?

ही वाहनतळाची की कोंडीची ठिकाणे?

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी अरुंद रस्तेमग बेकायदेशीर पार्किंग काय वाईट होती ?

नाशिक : शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला वाहनतळ उभारून स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील तेरा ठिकाणांचेच अधिकृत स्पॉट घोषित केले असले तरी अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत रहदारीचे तसेच काही रस्ते तर तुलनेत अरुंद असून, अशावेळी येथे मोटारी उभ्या करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या काही सदोष जागांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यापेक्षा वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
शहरात पुरेशी वाहनतळाची जागा कुठेही नाही त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी किंवा चारचाकी मोटार लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होते, अशी शासकीय यंत्रणांची तक्रार असते. त्यावर मात्रा म्हणून वाहने उचलेगिरीचा धंदा सुरू करण्यात आला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कडेला वाहने लावण्याचा प्रकार आॅन स्ट्रीट पार्किंग अंतर्गत सुरू करण्यात आला आहे.
एकुण २८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्यातील तेरा जागांवर स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील अनेक रस्ते हे अत्यंत रहदारीचे आहेत. नेहरू उद्यानालगत दुतर्फा मोटारी उभ्या करण्याची सोय आहे, मात्र उद्यान त्याबाहेरील अतिक्रमण यामुळे आधीच गर्दी झाली असताना तेथे मोटारी उभ्या केल्याने वळणावर रस्ता अधिक अरुंद होतो. विशेषत: नामको बॅँकेच्या जवळ एक बस जात असली तरी तेथे वाहतूक ठप्प होत असताना तेथे वाहनतळ हे डोकेदुखीच ठरण्याची शक्यता आहे.
सिटी सेंटर मॉलच्या बाहेरील वाहनतळ तर आणखी गैरसोयीचे आहे. मुळातच मॉलमध्ये वाहनतळ असूनदेखील रस्त्यावर वाहने उभी केली जातात आणि आता त्याला अधिकृत करण्यात आले आहेत. येथे मॉल, मंदिर, अनेक हॉटेल्स आणि दोन मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असताना आता मोटारी उभ्या करण्यास मुक्त परवाना देण्यात आल्याने अडचण होणार आहे. जेहान सर्कल, कॅनडा कॉर्नर, थत्तेनगर अशा अनेक जागा निवडताना त्याचा व्यवहार्य विचार करण्यात आलेला नाही. याठिकाणी यापूर्वी वाहने उभी केली की वाहतुकीला अडथळा होत असल्याने कारवाई केली जात होती, मग आता अडथळा होणार नाही काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहनतळ व क्षमता
कुलकर्णी गार्डन- २६
४कॅनडा कॉर्नर बीएसएनएल आॅफिस- ६६
४ज्योती स्टोअर्स गंगापूर नाका- २४०
४प्रमोद महाजन गार्डन- ८३
४गंगापूर नाका ते जेहान सर्कल- ५९३
४जेहान सर्कल ते गुरु जी रुग्णालय- १६५
४कॅनडा कॉर्नर ते विसेमळा- ११६
४जेहान सर्कल ते एबीबी सर्कल- ७८७
४गुरु जी रु ग्णालय ते पाइपलाइनरोड- ७९
४मोडक पॉइंट ते खडकाळीरोड- ७८
४थत्तेनगर (दोन्ही बाजूला)- १६४
४शरद पेट्रोलिअम ते वेस्टसाईड- २१७
४शालिमार ते नेहरू गार्डन (दोन्ही बाजूला)- १०५

Web Title: These parking places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.