..ते निघाले आहेत निफाड येथून राजस्थानला पायी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:18 PM2020-03-27T23:18:12+5:302020-03-27T23:18:27+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.
येवला : पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.
निफाड येथीलही राजस्थानच्या चार युवा मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून, ते येवलामार्गे रवाना झाले आहेत.
संचारबंदीच्या सुरुवातीस ज्यांना शक्य होते त्यांनी आपले घर जवळ केले. मात्र जे थांबले त्यांची पंचाईत झाली आहे. हाताला काम नाही, रस्त्यावर यायचे नाही. परिणामी खिशात पैसा नसल्याने घरात बसून उपासमारी सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिला नाही.
संचारबंदीमुळे प्रवासासाठी सार्वजनिक व खासगी वाहन व्यवस्थाही नसल्याने राजस्थान राज्यातून आलेल्या गारेगार विक्री करणाऱ्या चार युवकांनी राजस्थानच्या दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाचशे ते हजार किलोमीटरचे अंतर ते कसे गाठतील हा प्रश्न संवेदनशील मनाला न पडला तर नवलच!
निफाड येथे गारेगार विकणाºया एका मालकाने राजस्थानातील चार युवकांना गारेगार, आइस्क्र ीम विक्रीसाठी आणले होते. मागील महिन्यात तो मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला. मात्र, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मालकाला राजस्थानमधून महाराष्ट्रात येता येईना. त्याचदरम्यान लॉकडाउन व संचारबंदीही लागू
त्यामुळे रोजगार बुडाला. खिशात पैसे नाही आणि मालकाकडूनही पैसे येईनात. यामुळे या तरुणांना
पायी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. रस्त्याने जे पदरात पडेल त्याने तहान-भूक भागवत हे तरुण राजस्थानकडे निघाले आहेत.