बैलांना ते देतात दररोज दूध, अंडी, मठ, उदीड डाळीचा खुराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:59+5:302021-09-05T04:17:59+5:30
कोट- माझ्याकडे असलेल्या बैलजोडीच्या माध्यमातून मी नांगरणी, वखरणीची कामे करतो. त्यामुळे बैलांच्या चाऱ्याचा खर्च तर निघतोच पण घरखर्चालाही हातभार ...
कोट-
माझ्याकडे असलेल्या बैलजोडीच्या माध्यमातून मी नांगरणी, वखरणीची कामे करतो. त्यामुळे बैलांच्या चाऱ्याचा खर्च तर निघतोच पण घरखर्चालाही हातभार लागतो आणि घरच्या शेतीची कामे होतात.
- प्रवीण ढिकले, शेतकरी, सय्यद पिंपरी
कोट-
आमच्याकडे ज्या जातीची खोंडे आहेत ती जिल्ह्यात कुणीही आणत नाहीत. आमच्याकडील बैलांना दूध, उदीड डाळ, मठ डाळ, शेंगदाणा पेंड, अंडी, गव्हाचे पीठ यांचा खुराक दिला जातो. यामुळे बैल चांगले धष्टपुष्ट होतात. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर असला तरी हौस म्हणून आम्ही बैलांचे संगोपन करतो. शर्यतीलाही उतरत होतो. पण आता त्या बंद आहेत. या बैलांची विक्री केली तर चांगले उत्पन्न मिळते.
- समाधान आगळे, शेतकरी, पळसे.
कोट-
बैलांमुुळे आमची शेतीची कामेही होतात. शिवाय त्यांच्या विक्रीतूून चांगले पैसेही मिळत असतात. बैलांना आम्ही शेंगदाणा पेंड, गहू, कुट्टी, घास गिणी गवत असा खुराक देत असतो. कमी वयाची आणलेली खोंडे काही महिने सांभाळली तरी त्यांना चांगली किमत मिळत असते.
- विलास गायधनी, शेतकरी, पळसे