भाषा येत नसल्याचा फायदा घेत घर विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:20 AM2019-01-17T00:20:23+5:302019-01-17T00:23:49+5:30
नाशिक : मूळ कोलकाता येथील निवासी असलेल्या महिलेला मराठी भाषा येत नसल्याचा फायदा घेत काही संशयितांनी त्यांच्या भारतनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी तर केलीच; मात्र त्यांच्या घराची परस्पर विक्रीदेखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जरीना बेगम मोहंमद अलीम अन्सारी (५६, रा. भारतनगर, वडाळारोड, मूळ कोलकाता- १७) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करत संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. अन्सारी यांची भारतनगर येथे त्यांच्या मिळकतीच्या घरात काही कालावधीसाठी येथे राहत असताना संशयित दिगंबर भागूजी आव्हाड व त्याच्या इतर साथीदारांनी संगनमत करून त्यांना मराठी येत नसल्याचा फायदा घेत ४ मे २०१८ ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्यांची मिळकत भाडेतत्त्वावर घेत आहेत, असा बनाव केला. यानंतर त्यांची मिळकत गिळंकृत करण्यासाठी त्यांच्या दोन स्टॅम्पपेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्यांची मिळकत नावे करवून घेत ही मिळकत अजिजा खान नावाच्या महिलेला परस्पर विक्र ी करून फसवणूक केली.
दरम्यान, अन्सारी या कामानिमित्त भारतनगर येथील घराला कुलूप लावून कोलकाता येथे गेल्याचा फायदा घेत संशयितांनी घरफोडी केली. त्यांच्या घरातील डिनर सेटपासून दागिन्यांपर्यंत तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.