...त्यांनी केली वंचितांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:44 PM2019-10-27T23:44:20+5:302019-10-28T00:03:39+5:30

आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते.

 ... they made Diwali sweet for the poor | ...त्यांनी केली वंचितांची दिवाळी गोड

...त्यांनी केली वंचितांची दिवाळी गोड

Next

नाशिक : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी शहरातील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वेगवेगळे उपक्रम राबविले होते.
दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमीच अंधार असतो. यामुळेच शहरातील काही सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजुंना कपडे, मिठाईचे वाटप केले. शहरातील ‘मानव उत्थान मंच’, ‘रॉबिनहुड आर्मी’आदींनी गरिबांच्या जीवनात प्रकाशमान करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
‘शेअरिंग जॉय मोहिमे’तून
त्यांनी केले कपड्यांचे वाटप
देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत जावे या उक्तीप्रमाणेच मानव उत्थान मंच सलग नऊ वर्षांपासून ‘शेअरिंग जॉय’ उपक्र म राबवून अनेक लोकांच्या चेहºयावरच्या हास्याचे कारण बनत आहे. सणोत्सवाच्या दिवशी कामावर असलेल्या गरीब व होतकरु लोकांना तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घेण्यात आला. यासाठी संस्थेतर्फे ६ गट तयार करण्यात आले होते. त्र्यंबकरोड, पेठरोड, नाशिकरोड, घोटीरोड, दिंडरीरोड भागात हा उपक्रम राबविण्यात आला. सामनगाव येथील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात यादिवशी सुमारे ७० ते ७५ ज्येष्ठ महिला व पुरुषांना साडी, कुर्ता, बेडशिट, काजू, बदाम, मनुके, व खुजराचा बॉक्स तसेच एक भेटवस्तु देण्यात आली. तर इतर मार्गांवरील गरीब व होतकरु गरजुंना भेटवस्तू व ड्रायफ्रुटचा बॉक्स देण्यात आला. या उपक्रमासाठी १.५ लाख रुपये जमा करुन यातून सुमारे २५० गरिबांना भेटवस्तू देण्यात येणार आल्या.
रॉबिनहूड आर्मीने जपली
सामाजिक बांधिलकी
जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी रॉबिनहूड आर्मी आज नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त संस्थेकडून कपडे व फराळ वाटप करण्यात येते. समाजातील लोकांना आवाहन करुन यावर्षी त्यांनी देणगी जमा करत वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा मानस केला होता. याप्रमाणे आर्मीकडे मोठ्या प्रमाणावर फराळ, मिठाई, कपडे जमा झाले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच संस्थेमार्फत शहरातील विविध ठिकाणी जात गरीब,गरजू लोकांसाठी मिठाई, फराळ, व कपडे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालय, आदिवासी भागातील टाकळी गावात जाऊन तेथील गरजूंना कपडे व फराळ वाटप केले. यावेळी संस्थेतर्फे एकून ५०० मिठाईचे बॉक्स फराळ वाटप करण्यात आले. तसेच सुमारे १ हजार व्यक्तिंना नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावणारे शहरातील पोलिस, सफाई कर्मचारी यांनादेखील मिठाईचे वाटप करण्यात आले.
गेल्या नऊ वर्षांपासुन संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी यात मोठी भर पडली असून समाजातील अनेक व्यक्तिंनी यासाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे आमचा ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम साध्य होऊ शकला. यामुळे ज्यांनी या उपक्रमासाठी हातभार लावला त्यांचे आम्ही आभारी आहोत.
- जगबीर सिंग, अध्यक्ष, मानव उत्थान मंच
रॉबिनहूड आर्मी ही भारतातील सर्वच शहरांत कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त संस्थेतर्फे मिठाई व फराळ वाटप करण्यात येते. यानुसार नाशिकमध्येही गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी समाजातील लोकांची मोठी मदत लाभली. यामुळे त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू
- अभिजित कासार, समन्वयक, रॉबिनहूड आर्मी

Web Title:  ... they made Diwali sweet for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.