केवळ जीवामृतावर ते घेतात एकरी २५ टन ऊसाचे ऊत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:07+5:302021-07-25T04:14:07+5:30
चौकट- ऊस घेऊन थेट गाठली बँक जाधव यांनी सेंद्रिय गूळ तयार करण्याची कल्पना बँक अधिकाऱ्यांना सांगत कर्जाची मागणी केली ...
चौकट-
ऊस घेऊन थेट गाठली बँक
जाधव यांनी सेंद्रिय गूळ तयार करण्याची कल्पना बँक अधिकाऱ्यांना सांगत कर्जाची मागणी केली तेव्हा त्यांचाही त्यावर विश्वास बसला नाही. यामुळे त्यांना कर्ज मिळण्यास अनेक अडचणी आल्या. मात्र आपल्या शेतात पिकलेला सेंद्रिय ऊस घेऊन ते थेट बँकेत गेले. त्यांचा ऊस आणि इतर उसातील फरक पाहून अधिकारीही चक्रावले आणि त्यांना कर्ज मंजूर झाले.
कोट-
रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा खर्च करणे परवडेनासे झाले आहे. याउलट जीवामृत तयार करण्यासाठी लागणारा खर्च खूपच कमी आहे. या कमी खर्चीक सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी आता वळायला हवे. आमच्याकडील अनेक शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
- शिवाजी जाधव, शेतकरी