स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते पुरवितात दोन घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:35+5:302021-05-20T04:16:35+5:30
केारोनाच्या दुसऱ्या लाटेस फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल या कालावधीत बांधितांची संख्या वाढली, तसा मृत्यूदरदेखील वाढला होता. ...
केारोनाच्या दुसऱ्या लाटेस फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल या कालावधीत बांधितांची संख्या वाढली, तसा मृत्यूदरदेखील वाढला होता. एकेका दिवसात पन्नासहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकमध्येच त्यावर अंत्यसंस्कार होत होते. अशावेळी अहरोत्र काम करणाऱ्या कामगारांना वेटिंगमुळे तेथून बाहेरदेखील जाता येत नसल्याने अनेक कामगार तर भोजनही करीत नव्हते. पंचवटीतील अमोल जगळे हे तसे नेहमीच सामाजिक कार्यामुळे अमरधामच्या कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात होते. त्यांनी हा प्रकार बघितल्यावर त्यांच्या गढीव्रत ढोलवाद्य पथकाच्या आपल्या मित्र परिवाराला हा प्रकार सांगितला आणि अमरधाममध्ये काम करणाऱ्यांना भोजनाचे डबे देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला शिवभोजन थाळी खरेदी करून त्यांनी दिल्या, तर नंतर स्वखर्चाने धान्य आणून त्यांचे डबे पुरविण्याचे काम सुरू केले. अमोल कोल्हे, महेश पाटील, इश्वर कदम, स्वप्नील दिघोळे, ओंकार इंगळे, सिद्धांत गरुड यांच्यासह अनेक युवक यात सहभागी झाले. दररोज सकाळ आणि सायंकाळी दोन वेळचे डबे नाशिक पंचवटीसह महापालिकेच्या सात ते आठ स्मशानभूमीत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आणि त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ येऊ लागला. आता केवळ अमरधाममधील नागरिकांनाच नव्हे, तर अन्य संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असेल तर त्यांनादेखील डबे विनामूल्य घरपोच देण्याचे काम हे युवक करीत आहेत.
इन्फो..
अनेक रुग्णालयांत बाहेरून आलेले कोरोनाबाधित आणि त्यांचे कुटुंबीय असतात. अशा कुटुंबीयांची भोजनाची सोय नसल्याने त्यांची अडचण होते. सध्या तर हॉटेल्सही बंद. अशावेळी या युवकांनी अशा वर्गालादेखील भोजन पोहोचविण्याचे काम केले, तसेच शहरात अनेक कुटूंब कोरोनाबाधित होते, ते बरे झाल्यानंतर लगेचच कामावर जाऊ शकत नसल्याने त्यांच्यादेखील भुकेची जाण ठेवून या युवकांनी त्यांना डबे पोहोचविण्याचे काम सुरू ठेवले आहे.
----------
छायाचित्र आर फेाटोवर १९ अमरधाम
===Photopath===
190521\19nsk_33_19052021_13.jpg
===Caption===
अमरधाम