‘त्यांनी’ बळी दिला पण भुजात बळ होते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:32+5:302021-09-12T04:17:32+5:30
पिंपळगाव बसवंत जोपुळ रोड वरील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा लोकार्पण सोहळा भुजबळ यांच्या हस्ते झाला. ...
पिंपळगाव बसवंत जोपुळ रोड वरील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा लोकार्पण सोहळा भुजबळ यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, ऑक्सिजनसाठी प्रत्येकाची धावपळ होत होती. एरवी या जिल्ह्याला ८० मेट्रिक पेक्षाही कमी ऑक्सिजन लागायचा. मात्र जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा त्याचे प्रमाण १३० मेट्रिकच्या पुढे गेले. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण ३५० मेट्रिक ऑक्सिजनची व्यवस्था करून ठेवली आहे. ती पुढे ४०० पर्यंत नेणार आहोत. ऑक्सिजन निर्मितीत नाशिक राज्यात एक नंबर असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मनोगत व्यक्त करत उपजिल्हा रुग्णालय व ऑक्सिजन प्लांट विषयी माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार पंकज भुजबळ, पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अलका बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड,तानाजी बनकर,सागर कुंदे, शिवाजी ढेपले,सुरेश खोडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
भुजबळांचे स्वागत
प्रारंभी ओझर येथील खंडेराव मंदिराजवळ ओझरकरांच्या वतीने आणि पिंपळगाव बसवंत येथे पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने चिंचखेड चौफुली येथे भुजबळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निफाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी उपस्थितांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
फोटो - ११ पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर आदी.
110921\11nsk_19_11092021_13.jpg
फोटो - ११ पिंपळगाव बसवंत पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅनच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर आदी.