चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:26 PM2019-08-09T22:26:03+5:302019-08-10T00:19:03+5:30

घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली.

The thief pulled the woman's mangalsutra | चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र खेचले

चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र खेचले

Next

नाशिक : घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवपॅलेस अपार्टमेंटमध्ये राहणाºया शोभा गोवर्धने या गुरुवारी दुपारी मुलांना शिकवणीसाठी सोडण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराकडे परतत असतांना समोरून येणाºया ट्रिपलसिट दुचाकीस्वारांपैकी
एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे
मंगळसूत्र खेचून नेले.
सिडको भागात तरुणाची आत्महत्या
 सिडकोतील उत्तमनगर भागात राहणाºया २० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निरज शंकर फेगडे (वय २०, रा.साईदर्शन रो-हाउस,आनंदवन कॉलनी असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. निरज याने गुरुवारी रात्री आपल्या घरात वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. राहुल पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.
दोघा महिलांचे मोबाइल लंपास
 मेनरोडवर खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन महिलांच्या पर्समधून चोरट्यांनी रोकडसह मोबाइल चोरून नेले. ही घटना धुमाळ पॉइंट भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी
शालनी विजय वर्मा (रा. रविशंकर मार्ग, फेम सिनेमामागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. वर्मा या आपली मैत्रिण अक्षदा यांच्यासोबत गुरुवारी खरेदीसाठी मेनरोड भागात आल्या होत्या. धुमाळ पॉइंट परिसरात त्या पंजाबी ड्रेस मटेरियल खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या व अक्षदा नामदेव गायकर यांच्या पर्समधून दोन मोबाइल व रोकड, असा सुमारे पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला.
उघड्या खिडकीतून मोबाइलची चोरी
 घराच्या उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना दिंडोरीरोड वरील पोकार कॉलनीत घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकार कॉलनीतील पर्ल सोसायटीत राहणारे विशाल पांडूरंग मोरवाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरवाल कुटुंबीय गुरुवारी आपापल्या कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून ड्रेसिंग टेबलवर चार्जिंगसाठी लावलेले सुमारे २३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले.
जेलरोड भागात घरफोड्यांमध्ये वाढ
 जेलरोड भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे. लोखंडे मळा पुष्पकनगर येथे बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जेलरोड लोखंडे मळा पुष्पकनगर येथील संदीप चंद्रभान मालुंजकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शुक्रवार (२ आॅगस्ट) रोजी सायंकाळी ५.३० वाजता चंद्रभान मालुंजकर हे बंगल्याला कुलूप लावून नातवाला घेण्यासाठी क्लासला गेले होते. अर्ध्या तासाच्या अवधीत अज्ञात चोरट्याने बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून पावणेचार तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, चारचाकी व दुचाकी गाडीचे मूळ कागदपत्र चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The thief pulled the woman's mangalsutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.