नवी मुंबईतील चोरटा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:57 PM2020-10-02T23:57:10+5:302020-10-03T00:59:56+5:30
नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले.
नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले.
नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी जबरी चोरी करणारा संशयित देवीप्रसाद शिवबादूर पाल (१९ रा. आत्मज करारा, रामपूर जोहनपुर, उत्तरप्रदेश) हा छापरा एक्सप्रेसने मुंबई वरुन उत्तरप्रदेश येथे जात असल्याचे रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद आव्हाड यांंनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांना कळविले. आव्हाड यांनी त्याचे फोटोही पाठविले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू भोये, पोलीस हवालदार संतोष उफाडे, चंद्रभान उबाळे, कॉन्स्टेबल महेश सावंत, उगले यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छपरा एक्सप्रेस आल्यावर गाडीची झडती घेऊन फोटो वरून पाल यास पकडून ताब्यात घेतले. आरोपी पकडले ची माहिती रबाळे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी लागलीच नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीला ताब्यात घेतले.