धामणगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:53 IST2021-03-24T22:48:23+5:302021-03-25T00:53:41+5:30

सर्वतीर्थ टाकेद : धामणगाव येथील एस. एम. बी. टी. रुग्णालय आवारात महिनाभरापासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय कॅम्पसमधून पार्किंग केलेल्या ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Thieves are rampant in Dhamangaon area | धामणगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

धामणगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

ठळक मुद्देदुचाकीची चोरी : रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

सर्वतीर्थ टाकेद : धामणगाव येथील एस. एम. बी. टी. रुग्णालय आवारात महिनाभरापासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय कॅम्पसमधून पार्किंग केलेल्या ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या कारणास्तव रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. एक्स रे विभागात कार्यरत असलेले पवन गाढवे यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आठ ते सकाळी आठ अशा आपल्या कामाच्या वेळेत रुग्णालय पार्किंग आवारात आपली एमएच १५ बीसी २२६२ ही दुचाकी पार्क करून ते कामावर रुजू झाले.                सकाळी आठ वाजता कामाची वेळ संपताच पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी घेण्यासाठी गेले असता सदर ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, रुग्णालय आवारातून दुचाकी चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या धास्तीने सर्वच हैराण झाले आहेत.

Web Title: Thieves are rampant in Dhamangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.