खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 06:26 PM2020-07-30T18:26:41+5:302020-07-30T18:27:07+5:30
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरवड्यात तिसगाव शिवारातील पेट्रोल पंपावर चोरीची घटना ताजी असताना खेडगावात इलेक्ट्रिकल दुकानातील वस्तूंची चोरी झाली, तसेच बुधवारी (दि.२९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास खेडगाव येथील वणी पिंपळगाव रस्त्यालगत सुरेश गोपाळा सोनवणे यांच्या शेतातील द्राक्षबागेचे एक ते सव्वा लाख रु पये किमतीचे १८० नग ९ फुटी अँगल चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केले. तसेच ४० नग दुसऱ्यांदा चोरी करण्याच्या उद्देशाने वस्तीपासून काही अंतरावर मातीच्या ढिगाºयाखाली लपवून ठेवले होते. शिवाय त्याच रात्री भिकाजी रामकृष्ण उगले यांच्या द्राक्ष बागेची पंचवीस ते तीस झाडे हत्याराने कापून नुकसान केले आहे.
दरम्याना दोन दिवसांपूर्वी गावामधून चार ते पाच मोटारसायकल बाजूला नेऊन त्यातून पेट्रोल काढून खेतल्याचा प्रकार उघडकीस आला. पेट्रोल चोरीच्या घटना खेडगावमध्ये रोज वाढत असून हे प्रकार थांबण्याकरीता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे
(फोटो ३० खेडगाव)