चोरट्यास अटक करून पाच मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:49 AM2018-07-24T00:49:44+5:302018-07-24T00:50:01+5:30

तरुणांना गाठून तुमच्या मोबाइलमध्ये माझ्या बहिणीचे फोटो आहेत असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या संशयितास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ विजय गुलाब धात्रक (२०,रा़ स्नेहनगर, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पळविलेले पाच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़

Thieves arrested and five mobile seized | चोरट्यास अटक करून पाच मोबाइल जप्त

चोरट्यास अटक करून पाच मोबाइल जप्त

Next

इंदिरानगर : तरुणांना गाठून तुमच्या मोबाइलमध्ये माझ्या बहिणीचे फोटो आहेत असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या संशयितास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ विजय गुलाब धात्रक (२०,रा़ स्नेहनगर, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पळविलेले पाच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़  युवकांना अडवून तुझ्या मोबाइलमध्ये माझ्या बहिणीचा फोटो असून, तू माज्या बहिणीस मेसेज का करतो, असे म्हणून मोबाइल बहिणीला दाखवून आणतो असे सांगून मोबाइल चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या़ त्यातच पाथर्डी फाट्यावरील प्रशांतनगर येथे उभे असलेले उत्तम पानसरे हे मित्रासह उभे असताना त्यांनाही अशाच प्रकारे धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या घटनांची गुन्हे शाखेने गोपनीय माहिती काढली असता संशयित धात्रक यास ताब्यात घेऊन चौकशी केली़ त्यामध्ये धात्रक याने परिसरातून मोबाइल चोरल्याची कबुली देत ज्यांना मोबाइल विकले त्यांची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी पाच मोबाइलही हस्तगत केले आहेत़ दरम्यान, धात्रक यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दत्तात्रेय पाळदे, अलाक शेक, रियाज शेख, विनोद खांडबहाले, शरद अहिरे, मानसिंग शिरसाठ यांनी ही कारवाई केली़

Web Title: Thieves arrested and five mobile seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.