सायखेडा येथे चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:08 AM2019-11-20T01:08:16+5:302019-11-20T01:09:07+5:30
गोदाकाठ भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सायखेडा येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आठ दिवसांत चार दुकाने फोडणाºया टोळीला त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी व्यावसायिक, नागरिक यांनी संयुक्तरीत्या पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चोरांना पकडावे अशी मागणी केली आहे.
नाशिक : गोदाकाठ भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सायखेडा येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आठ दिवसांत चार दुकाने फोडणाºया टोळीला त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी व्यावसायिक, नागरिक यांनी संयुक्तरीत्या पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चोरांना पकडावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी चार संशयित ताब्यात घेतले आहेत. वेगवेगळी दुकाने, बँका चोरट्यांनी लक्ष्य करीत हजारो रुपयांचा माल व रोकड लंपास केली आहे. शनिवारी रात्री कॉलेजरोडवरील शरद कुटे यांच्या अर्पिता फोटो स्टुडिओतील कॅमेरा, फ्लॅश, ट्रिगर, मॉनिटर, हार्डडिस्क, एटीएम कार्डसहित काही रोकड चोरट्यांनी लंपास केली.
या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच रात्रीच्या सुमारास सायखेडा येथील मेनरोडवरील मनभरी कापड दुकानातून चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला.
गुरुवारच्या आठवडे बाजारात मोबाइल चोरी जाण्याच्या घटनादेखील घडत आहे.