नांदूरशिंगोटेत चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:17 AM2019-12-07T01:17:08+5:302019-12-07T01:17:41+5:30
नांदूरशिंगोटे येथे चोरांनी गुरुवारी (दि.५) मध्यरात्री नऊ ठिकाणी दुकाने व घरे फोडली. यामध्ये चार ते पाच ठिकाणांहून सुमारे एक लाख रु पयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरी करीत असताना चोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.
नांदूरशिंगोटे : येथे चोरांनी गुरुवारी (दि.५) मध्यरात्री नऊ ठिकाणी दुकाने व घरे फोडली. यामध्ये चार ते पाच ठिकाणांहून सुमारे एक लाख रु पयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरी करीत असताना चोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.
नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ आहे. गुरु वारी मध्यरात्री दोन ते पहाटे सव्वाचार वाजेपर्यंत चोरांनी येथील दुकाने व घरांना लक्ष्य केले. रात्री चोरांनी बाजारतळालगत असणाºया उत्तम माळवे यांच्या ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही हाती लागले नाही. त्यानंतर नेहरू चौकातील कृष्णाबाई इलग यांच्या बंद असलेल्या घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथेही काही न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा निमोण रोडलगत असणाºया व्यापारी संकुलाकडे वळविला. येथील एका कापड दुकानाचे शटर तोडून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी जीन्स पॅन्ट, शर्ट आदींसह ५४ हजार रु पयांच्या कपड्यांवर डल्ला मारला. जवळच असलेल्या आॅटोमोबाइल्स व टायरच्या दुकानाचे शटर वाकवून चोरांनी टायर चोरले. अचानक गल्लीतील गर्जे यांचे घर फोडण्याचा प्रयत्नही चोरांनी केला. तेथून हायवेलगत असलेल्या बाळू महादू शेळके यांच्या किराणा दुकानाला लक्ष्य करीत दुकानातील पंधरा ते वीस हजार रु पयांची रोख रक्कम चोरून नेली.
मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे गावात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी गावात रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात संपर्ककरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडीले व सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ताातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा कामाला लावली आहे. शाहबाज मणियार यांनी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, हवालदार प्रवीण अंढागळे, एस. एस. चव्हाणके, एन. आर. आडके, आर. के. भांगरे, यू. के. आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले असून, त्या माध्यमातून चोरांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे. चोरांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथके रवाना केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले.
विविध दुकानांमधून रकमेची चोरी
चोरांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणी व पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाºया एका कपड्याच्या दुकानावर डल्ला मारला. कापड दुकानाचे मागील बाजूस असणारे शटर तोडून कपड्यांची चोरी केली. गट नंबर ५०७ मध्ये राहणाºया एकनाथ पंढरीनाथ शेळके यांचे धान्य व भुसार मालाचे गुदाम फोडण्याचाही प्रयत्न केला. दुकानातील काही रक्कम घेऊन ते पसार झाले. एका कपड्याच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरी करताना हे चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
(०६नांदूरशिंगोटे व१)
फोटो ओळी : नांदूरशिंगोटे येथील कापड दुकानाचे तोडलेले शटर व सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेले चोरटे.