कोरोनामुळे चोरटेही घरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:25+5:302021-04-29T04:11:25+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून दैनंदिन गुन्ह्यांचे प्रमाण अगदी शून्यावर आल्याचे दिसते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध ...
शहरात मागील काही दिवसांपासून दैनंदिन गुन्ह्यांचे प्रमाण अगदी शून्यावर आल्याचे दिसते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि रस्तोरस्ती चोख गस्त दिसून येत असल्याने गुन्हेगार भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे. घरफोडी, मारहाण, जबरी चोरी, वाहनचोरी, विनयभंग यांसारख्या विविध गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात झालेली वाढ आणि त्यामुळे व्यक्त केली जाणारी भीती यामुळे शहरातील सर्वच भागातील वर्दळ कमी झाली आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनाही कमी झाल्याचे दिसते. मागील वर्षीसुद्धा असाच काहीसा अनुभव नाशिककरांना थोड्याफार फरकाने नागरिकांना आला होता. एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत शहर व परिसरात गंभीर गुन्हे घडत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून यांसारख्या गुन्ह्याचा आलेख कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
---इन्फो--
खुनाच्या घटनांमध्ये वाढ
२०१९सालच्या तुलनेत २०२० साली पोलीस आयुक्तालयात खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गतवर्षीही मार्चपासून कोरोनाचा फैलाव शहरासह जिल्ह्यात सुरू झाला होता. २४ मार्चपासून तर जून २०२०पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात अन्य गुन्ह्यांचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी खुनाच्या घटनांमध्ये गेल्यावर्षी वाढ झाली होती. २०१९साली १९ तर २०२०मध्ये २३ खुनाच्या घटना घडल्या होत्या. तसेच यावर्षी गेल्या तीन महिन्यांत शहरात नऊ खून झाले आहेत.
---इन्फो--
विनयभंग घटले, बलात्कारात वाढ
२०१९साली विनयभंगाच्या १८८ घटना घडल्या होत्या. तसेच २०२०मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १५८ इतके राहिले. एकूणच विनयभंगाचे गुन्हे मागील वर्षी कोरोनाच्या साथीमुळे कमी झाल्याचे दिसून आले. यावर्षी मागील तीन महिन्यांत शहरात सुमारे २० ते २५ विनयभंगाच्या घटना घडल्याचा अंदाज आहे. तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये २०१९च्या तुलनेत गेल्या वर्षी काहीशी वाढ झाल्याचे दिसते. गेल्या वर्षी लॉकडाऊन जरी होते तरीदेखील शहरात बलात्काराच्या ५५ घटना नोंदविल्या गेल्या आहेत.
--आलेख--
चोरीच्या घटना
२०१९साली झालेल्या चोरीच्या घटना- ४२९
२०२०साली झालेल्या चोरीच्या घटना- २०९
२०२०साली झालेल्या वाहनचोरी - ३८६
---
डमी फॉरमेट- आर वर २८कोरोना ॲन्ड थिफ नावाने सेव्ह. फोटो २८मर्डर, २८थीप, २८रेप नावाने आहे.
===Photopath===
280421\28nsk_19_28042021_13.jpg
===Caption===
चोरटेही घरबंद!