सायखेड्यात बंद घरांवर चोरांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:41 PM2018-11-10T18:41:24+5:302018-11-10T18:42:31+5:30
दिवाळीनिमित्त बंद घरांचा शोध घेऊन अज्ञात चोरट्यांनी सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन टीव्ही, दोन मोटारसायकली, काही कपडे चोरून दिवाळीचा फायदा घेऊन पलायन केले. भर वस्तीत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायखेडा : दिवाळीनिमित्त बंद घरांचा शोध घेऊन अज्ञात चोरट्यांनी सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन टीव्ही, दोन मोटारसायकली, काही कपडे चोरून दिवाळीचा फायदा घेऊन पलायन केले. भर वस्तीत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिमालय सोसायटीत मध्यवर्ती डॉ. आबा पाटील यांच्या घरात सोनगाव येथील प्राथमिक शिक्षक संतोष भुसे भाडेकरू म्हणून राहतात. भाऊबिजेच्या निमित्ताने ते दुपारी बारा वाजता सिन्नर येथे बहिणीकडे गेले होते. पत्नी, मुले घरी नसल्याने त्यांनी घराला कुलूप लावले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी गेटची कडी तोडून आत प्रवेश केला. मुख्य दरवाज्याच्या कडीत लोखंडी गज घालून कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट, कोठी यातील सामान अस्ताव्यस्त केले. घरात कोणताही ऐवज मिळाला नाही. घरातील दोन टीव्ही आणि काही कपडे घेतले. घराच्या अंगणात लावलेल्या हिरो होंडा कंपनीची पॅशन रंग लाल आणि पांढऱ्या रंगाची मॅक्सो मोपेड हिरो या दोन गाड्या घेऊन पोबारा केला. आजच्या मूल्यांकनानुसार ६८ हजार रु पयांची चोरी झाल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. सकाळी दूधवाला नितीन खालकर आल्यानंतर त्याने गेट तोडलेले पाहिल्याने संतोष भुसे यांना दूरध्वनी करून सर्व माहिती कळविली. भुसे तत्काळ दाखल झाले. सायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट देऊन सदर चोरीचा पंचनामा केला. श्वान पथक बोलावून माग काढण्यात आले असता कॉलेज रोडने चोरटे पळाल्याचे प्रथम तपासात लक्षात आले आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.