थ्रीफेज विजेसाठी खानगाव उपकेंद्रात शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:11 AM2018-12-04T01:11:48+5:302018-12-04T01:12:29+5:30
वनसगाव : पालखेड कालव्याला पाणी असल्यामुळे वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या गावांना थ्रीफेज वीजपुरवठा पुरेसा होत नसल्याने परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांनी सोमवारी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली गेटबंद करत उपकेंद्रात दोन तास ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाºयांनी वरिष्ठांशी चर्चा करुन आठ तास वीज देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या ठिकाणी गेल्या काही दिवसातून केवळ चार तास वीजपुरवठा होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देत येत नाही. अशातच द्राक्ष हंगाम मध्यावर आल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी थ्रीफेज वीज उपलब्ध व्हावी यासाठी खानगाव येथील सबस्टेशनवर शेतकºयांनी गेटबंद करत अधिकाºयांना घेराव घातला व जाब विचारला. यावेळी वीज वितरण अधिकारी सोनवणे यांनी आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनात यागेश डुंबरे, उत्तम शिंदे, एकनाथ डुंबरे, उत्तम शिंदे, के. बी. शिंदे, राणुजी कापडी, संजय तोडकर, बाळासाहेब शिंदे, रघुनाथ श्ािंदे, संदीप चौधरी, शिवाजी वाघ, देवराम शिंदे लक्ष्मण शिंदे, महेश केदारे, आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.