शेतकऱ्याच्या प्रतिकाराने चोरट्यांचा पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 02:52 PM2020-01-04T14:52:14+5:302020-01-04T14:53:13+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात गेल्या महिनाभरापासून चोरांची दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटे जायगाव येथे चोरीचा प्रयत्न ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात गेल्या महिनाभरापासून चोरांची दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटे जायगाव येथे चोरीचा प्रयत्न फसल्याच्या रागातून शेतकºयावर हल्ला करीत चोरांनी पळ काढला .
गेल्या महिनाभरापासून नायगाव खोºयात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.नायगाव येथील युनियन बंँकेपाठोपाठ बुधवारी नाईक यांच्या मोबाईल दुकानातील चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना ताजी असतांनाच शनिवारी ( दि.४ ) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जायगाव-सिन्नर रस्त्यालगत राहणारे तुकाराम मारु ती गिते यांच्या वस्तीवर पुन्हा दोघा चोरांनी चोरीचा प्रयत्न केला.
तुकाराम गिते हे पाण्याचा बंब पेटविण्यासाठी उठले असतात्यांच्या पाळीव कुत्र्याने घराच्या लगत असलेल्या भिंतीकडे जोराने भुंकणे सुरू केल्याने गिते हे घराच्या पाठीमागे जात असतांनाच भिंतीच्या आड दबा धरु न बसलेल्या चोरट्याने गिते यांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या तोंडावर हात ठेवत धक्काबुक्की सुरू केली.घाबरलेल्या गिते यांनी तोंडावर ठेवलेल्या चोराच्या हाताला जोराचा चावा घेतला.गिते यांनी चोराचा प्रतिकार करत आरडारडाओरडा सुरू करताच चोराने पुन्हा मारहाण करून गिते यांना जोराचा धक्का देत कांद्याच्या शेतातून रस्त्याकडे पळ काढला.
सुमारे पंधरा मिनिटांच्या झटापटीने घरातील व काही अंतरावर शेतात पाणी भरणाºया शेतकºयांना आवाज गेल्याने सर्वच शेतकºयांनी गिते वस्तीकडे बॅटºया चमकावल्या. यामुळे चोरट्यांनी हातातील लोखंडी कांब तेथेच टाकून रस्त्यालगत असलेल्या फाँरेस्टच्या डोंगराकडे पलायन केले.
सकाळी सदर घटनेची माहिती गाव व परिसरात पसरताच अनेकांनी गिते यांच्या घरी गर्दी करीत घटनेची चौकशी केली.एम.आय.डी.सी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
दरम्यान गुरूवारी रात्री याच परिसरातील गणपत पंढरीनाथ गिते यांच्या कृषी पंपाची व केबलची चोरी झाली आहे.त्यामुळे नायगाव परिसरात या चोरांची दहशत निर्माण झाली असली तरी या चोरांचा तिसरा प्रयत्न फसल्याची व चोरीसाठी वापरलेले हत्यारे जागेवर टाकण्याच्या एक सारख्या पध्दतीची चर्चा होत आहे.