नाशकात चोरट्यांचा सुळसुळाट ; पंचवटीत घरफोडी, इंदिरानगरमध्ये पैशांची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:51 PM2020-01-24T16:51:18+5:302020-01-24T16:56:17+5:30
पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
नाशिक : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दिवसेंदिवस घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे.
पंचवटीतील पेठरोड दत्तनगर परिसरात एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे ९५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात सुदाम काशिनाथ थिटे (६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम थिटे बुधवार (दि.२२) व गुरुवार (दि.२२) या दोन दिवसाच्या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही, गॅस सिलेंडर तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि रोख ३० हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. थिटे घरी आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले त्यांनी घरात प्रवेश केला लोखंडी कपाट उघडे दिसले व त्यातील सोन्याचांदीचे दागिने, असता किचनच्या लाफ्टवरी कडीच्या डब्यात ठेवलेले रोख रक्कम, किचनमधील गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे दिसले त्यावरून घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत
तक्रार दाखल केली आहे.
गाडीची काच फोडून रोकड लंपास
इंदिरानगरच्या राजीवनगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळात उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून पुढील सीटवर ठेवलेल्या बॅग मधून सुमारे ८६ हजार चारशे रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले. राजीवनगरच्या प्रथमेश अपार्टमेटमधील बिनय थॉमस (४७)गुरुवारी (दि२३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी क्रमांक एमएच १५ सिटी ४२३२ गाडीची चालकाच्या शेजारील दरवाजाची काच फोडून पुढच्या सीटवर ठेवललेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली. त्यात ८६ हजार चारशे रुपये रोख व दुकानाचे हिशोबाचे कागदपत्रे असा मुद्देमाल दोघ्या चोरट्यांनी चोरून दुचाकीने धूम स्टाइल पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.