चोरट्यांकडून लाखोंचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:58 PM2019-04-18T23:58:59+5:302019-04-19T00:17:15+5:30
सिन्नर येथील तिघा सराईत चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध चोरीतील सुमारे लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.
नाशिकरोड : सिन्नर येथील तिघा सराईत चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध चोरीतील सुमारे लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.
सिन्नरचे सराईत चोरटे हे वास्को चौकात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती नाशिकरोड गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी विशाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, कय्युम सय्यद, निखिल वाघचौरे, सोमनाथ जाधव यांनी वास्को चौकात सापळा रचून संशयित राहुल दिलीप धोत्रे (वय १९ रा. ऐश्वर्या गार्डनजवळ मस्जिदमागे सिन्नर), रोशन किसन महात्मे (वय २१, रा. शिवाजीनगर, सिन्नर) या दोघांना पकडले.
कसून चौकशीत गुन्हे उघडकीस त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा तिसरा साथीदार सिन्नर तालुक्यातील डुबेरगाव येथील मोहन सुभाष वाजे (१८) यासदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघा सराईत चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून दीड तोळ्याची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर, होंडा शाइन दुचाकी तसेच अंबड परिसरातील चोरीतील २० हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.