देवगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:54 PM2019-09-28T17:54:35+5:302019-09-28T17:54:43+5:30
देवगाव : गेल्या आठवड्यापासून देवगावसह परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
देवगाव : गेल्या आठवड्यापासून देवगावसह परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
देवगावसह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून भुरटे चोरटे सक्रिय झाले आहेत. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराजवळील इंदिरानगर क्र मांक ९१ या अंगणवाडीच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी गॅस सिंलिडर चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न झाला. दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीचे प्रकार घडले.
धाणोरे स्त्यालगत राहणारे समाधान रोकडे हे शेतात गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दोन शेळ्या चोरून नेल्या. तसेच रात्री घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकीचे पेट्रोल चोरीला जात आहे. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.