चोरट्यांनी मारला बिअरबारच्या दुकानावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:20+5:302021-01-23T04:15:20+5:30

येथील गणेश शिवदास क्षत्रिय यांचे सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कडेला वावीच्या पूर्वेला गावाबाहेर समृद्धी बिअर बारचे दुकान आहे. दूकानाभोवती संरक्षक भिंत ...

Thieves stormed a beer bar | चोरट्यांनी मारला बिअरबारच्या दुकानावर डल्ला

चोरट्यांनी मारला बिअरबारच्या दुकानावर डल्ला

Next

येथील गणेश शिवदास क्षत्रिय यांचे सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कडेला वावीच्या पूर्वेला गावाबाहेर समृद्धी बिअर बारचे दुकान आहे. दूकानाभोवती संरक्षक भिंत आहे. चोरटे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आत आले. दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी किचनमध्ये प्रवेश केला. तेथे असलेल्या चावीचा चुडगा घेऊन चोरट्यांनी उर्वरित रूम उघडल्या.

दुकानात ठेवलेले इंग्लिश दारुचे महागडे बॉक्स व बिअरचे काही बॉक्स घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी सोबत चारचाकी वाहन आणले असावे. त्यात दारूचे बॉक्स भरून ते फरार झाले. चोरट्यांनी फ्रीजमध्ये असलेल्या बिअरच्या बाटल्यांचाही आस्वाद घेतला. दुकानाच्या पाठीमागेच हॉटेलचा कुक व सुरक्षा रक्षक राहायला आहे. त्यांना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आवाज आल्यानंतर त्यांनी गणेश क्षत्रिय यांना घटनेची माहिती दिली. क्षत्रिय यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षत्रिय यांनी चोरीप्रकरणी चोरट्यांविरोधात वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चौकट-

चोरटे सीसीटीव्हीत कैद

क्षत्रिय यांच्या समृद्धी बिअर बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चार चोरटे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानात आले. त्यानंतर त्यांनी दारुचे बॉक्स नेण्यास सुरुवात केली. चोरट्यांचे साथीदार कंपाैंड बाहेर चारचाकी वाहन घेऊन थांबले असल्याची शक्यता असून त्यात बॉक्स घेऊन ते फरार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Thieves stormed a beer bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.