चोरीच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकताच चोराला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:07 PM2019-12-30T18:07:44+5:302019-12-30T18:11:10+5:30
लासलगाव : चोरलेल्या नवीन मोबाईल मध्ये सिमकार्ड कार्यान्वित केल्या नंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेत सी सी टीव्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिक विश्लेषणद्वारे लासलगावचे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत आरोपी पर्यंत धुळे येथे पोहचले व या सराईत मोबाईल चोराला बेड्या ठोकल्या.

लासलगाव पोलीस स्टेशनला मयुर वाघचौरे यांनी रविवारी (दि.८) मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाडीलाल जाधव हे करीत होते.
सदर गुन्हयाचा तपासाबाबत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर व निफाड पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी केलेल्या मार्गदर्शक व सुचनाप्रमाणे यातील गुन्ह्यातील संशयित इसमाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणानुसार मिळलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांच्या पथकाने बाम्हणे ता. साक्र ी, जिल्हा धुळे येथील संशयित संदीप सुरेश पाटील (४०) यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतून श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक दुकान लासलगाव येथून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अजुन मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास वाडीलाल जाधव हे करीत आहे.
(फोटो ३० लासलगाव)