बॅँक समजून इतर कार्यालयांचीच नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:48 PM2019-02-02T22:48:19+5:302019-02-02T22:48:34+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे रात्री बॅँक आॅफ महाराष्ट्र समजून चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट आॅफिस या तिन्ही कार्यालयांचे कुलूप तोडून कार्यालयातील कपाटाचे दरवाजे वाकवून कागदपत्रांची नासधूस केल्याची घटना घडली. तसेच गावातील साईनाथ नारायण सोनवणे यांच्या मोटरसायकलची तोडफोड केली.

येथील ग्रामपंचायत कार्यालयाला दर्शनी भागात बँक आॅफ महाराष्ट्र नावाचा मोठा बोर्ड लावलेला आहे. तेथे बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन आहे. राजापूर येथे मागे काही दिवसांपूर्वीच धनराज नाना वाघ व अशोक रखमा वाघ या दोघा शेतकऱ्यांच्या नवीन मोटारसायकल घरासमोरून चोरीला गेल्या आहे.
महिन्यापूर्वीच गणाधीश इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकाच्या निवासस्थानाचे कुलूप तोडले होते. अशा घटना राजापूर येथे नेहमी घडतात. तलाठी कार्यलयातील कपाटाचा दरवाजा वाकवून कागदपत्राची नासधूस केली. घटनास्थळी सपोनि देवीदास पाटील, पोलीस हवालदार सुरासे, ज्ञानेश्वर हेंबाडे यांनी पंचनामा केला व येवला पंचायत समिती गटविकासधिकारी शेख, विस्तार अधिकारी यादव यांनी घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी राजापूर येथे पोलीस चौकी व्हावी अशी मागणी लक्ष्मण घुगे, भारत वाघ यांनी केली आहे. ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. या चोºयांमुळे राजापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण असून, राजापूर व परिसरात सध्या दुष्काळामुळे जनता हैराण झाली आहे. त्यात चोºया सुरू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.चोरट्यांनी येवला - नांदगाव रोडवर पंपाजवळ दादा विंचू यांच्या बंगल्याला असलेची तार कंपाऊड तोडून चोरटे आत गेले. तेथे वयोवृद्ध माणसे असल्याने चोरट्यांनी त्याच्याकडे पिण्यासाठी पाणी द्या व पेट्रोल घेण्यासाठी रिकामी पाण्याची बाटली मागितली व चोरटे निघून गेले व त्यांनी बॅँक समजून तिन्ही कार्यलायाचे कुलूप तोडले. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.