पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

By admin | Published: November 11, 2016 12:23 AM2016-11-11T00:23:24+5:302016-11-11T00:19:39+5:30

पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

Think of five hundred rupees notes in temple gift box | पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

Next

पंचवटी : केंद्र सरकारने मोठ्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांबरोबरच देवादिकांना बसला आहे. नाशिकमधील प्रमुख मंदिरांमध्ये दानपेटीत नोटा टाकण्याचे आणि देणगी देण्याचे प्रमाण घटले आहे. विशेष म्हणजे कपालेश्वर मंदिरात तर मंदिर व्यवस्थापनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचा फलक झळकविला आहे.
काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम मंदिरातील देणगी रकमेवर झाला आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे. नाशिकला दररोज शेकडो भाविक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सीतागुंफा, रामकुंड येथे येत असतात. मात्र मागील दोन दिवसांपासून केवळ बोटावर मोजता येतील इतकेच भाविक मंदिरात दिसून येत आहे. देवदर्शन करण्यासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात देणगी देत असतात, मात्र दोन दिवसांपूर्वी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम देणगी रकमेवर झाला आहे.
नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिर व्यवस्थापनाने भाविकांनी दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा टाकू नये, असा फलक लिहून पाचशे व एक हजार रुपयांची देणगी स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. दुसरीकडे श्री काळाराम मंदिरात येणारे भाविकदेखील रोख स्वरूपात मंदिरात देणगी पावती फाडत नसल्याने देणगी रकमेत घट झाली असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने देवदेवतांच्या देणगी रकमेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Think of five hundred rupees notes in temple gift box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.