घुसखोरी रोखण्यासाठी ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:59 AM2019-02-01T00:59:55+5:302019-02-01T01:01:04+5:30
नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मरण पावले. या प्रकरणी वन्यजीव विभागाने गुन्हा दाखल केला होता. घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. वन्यजीव विभागाने ३६० अंशात फिरणारे व जास्त मीटरपर्यंत दिवस-रात्र चित्रीकरणाची क्षमता ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना वावर कायद्याने गुन्हा ठरतो; मात्र मासेमारी करणाऱ्याकडून सर्रासपणे घुसखोरी केली जाते. मासेमारीचे जाळे टाकून घुसखोर फरार होतात. अनकेदा पक्षी अडकून जायबंदी होतात. आठवडाभरापूर्वी १८ पक्ष्यांचा जाळ्यात तडफडून मृत्यू झाला होता. अभयारण्य संरक्षणासाठी व्यवस्थापन आराखड्यानुसार उपाययोजना वन्यजीव विभागाने आखल्या आहेत. याअंतर्गत महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होतील, अशी माहिती वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. चापडगाव संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे जलाशयात एक सीसीटीव्ही कार्यान्वित आहे.
चापडगाव संकुल येथून मुख्यत: अधिकृत प्रवेश अभयारण्याच्या क्षेत्रात दिला जातो; मात्र काही गावांमधून चोरवाटा तयार करण्यात आल्या आहे. गस्ती पथकाने या शोधल्या असून, त्यावर पथक नजर ठेवून आहेत. संध्याकाळनंतर अभयारण्याच्या प्रदेशात प्रवेश करून जलाशयात मासेमारी करण्याकरिता जाळे टाकणाºयांवर कारवाई करणे कॅमेºयांमुळे सोपे होणार आहे.
सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, इको-एको संस्थेचे अभिजित महाले, वैभव भोगले आदी उपस्थित होते.रात्री चालणारे गैरप्रकार होणार ‘कैद’ज्या भागातून मासेमारीकरिता प्रवेश केला जातो त्या भागात रात्रीच्या वेळीदेखील स्पष्टपणे हालचाल टिपली जाईल, या क्षमतेचे कॅ मेरे वाढविण्यात येणार आहे. फेब्रुवारीअखेर किमान पाच कॅमेरे कार्यान्वित होणार असून, पुढील सहा महिन्यांत पंधरा ते वीस कॅमेºयांच्या देखरेखीखाली अभयारण्य येणार आहे.