अकरावीची तिसरी यादी एक आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:40 AM2019-07-30T00:40:32+5:302019-07-30T00:41:31+5:30
आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
नाशिक : आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांना २ ते ५ आॅगस्टदरम्यान प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून १२ जुलैला पहिली यादी जाहीर झाली. त्यात १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यातील ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले, तर २२ जुलैला जाहीर झालेल्या दुसºया यादीत ६ हजार ६४२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, त्यातील २ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले असून आतापर्यंत सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. दुसºया यादीत आरवायके महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटआॅफ सर्वाधिक ८९.४० टक्के तर बीवायके महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा कटआॅफ ८४.४० टक्के लागला होता. काही विद्यार्थ्यांनी दुसºया पसंतीच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतला.